Home जिल्हा वंधली येथे १८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

वंधली येथे १८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

वरोरा :- तालुक्यातील माढेळी जवळील वंधली येथे एका १८ वर्षीय तरुण युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी ८ वाजता घडली.साहिल हनुमान कन्नाके (वय १८ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, साहिल हा सकाळी शेतात फवारणीकरिता जाण्याच्या तयारीत होता. दरम्यान, घरातून निघण्याच्या वेळेस अवघ्या पंधरा मिनिटांची संधी साधत त्याने घरातील आढ्याला नायलॉन दोर लावून गळफास घेतला.



सदर तरुण मागील चार दिवसांपासून तणावात असल्याचे समजते. मात्र, त्याने हे टोकाचे पाऊल नेमके कशासाठी उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.