मारेगाव :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धडाडीच्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या ‘महाराष्ट्र धर्म’ या विचारांवर विश्वास ठेवून मारेगाव तालुक्यातील अर्जुनी गावातील असंख्य तरुणांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या वेळी राजू उंबरकर यांच्या हस्ते उपस्थित सर्व नवप्रविष्ट तरुणांच्या हातात मनसेचा झेंडा व गळ्यात पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे अधिकृत स्वागत करण्यात आले.
या पक्षप्रवेश सोहळ्यात अर्जुनी शाखेच्या अध्यक्षपदी सुरज कुडमेथे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासोबत जिवन टेकाम, संजय आत्राम, संतोष आत्राम, चिनाराम आत्राम, विजय मेश्राम, गोवर्धन देवतळे, ज्ञानेश्वर टेकाम, मंगेश आत्राम, दिवाकर आत्राम, अरुण मडावी, गजानन मेश्राम, श्याम मडावी, प्रशांत मडावी, पवन टेकाम, नामदेव मडावी, विनोद आत्राम, प्रविण टेकाम, करण मडावी, प्रभाकर मडावी, सुनील मडावी, सतीष पोहनकर, विकास टेकाम, नितीन गोडे, अजय कुडमेथे, विनोद रायपुरे आणि मानिक मेश्राम यांनी मनसेमध्ये अधिकृत प्रवेश केला. स्थानिक जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आक्रमक लढा उभारणे आणि राज ठाकरेंचे विचार तळागाळातील घराघरांपर्यंत पोहोचवणे हाच आमचा मुख्य उद्देश असेल, असा निर्धार या वेळी नवप्रविष्ट तरुणांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, शहराध्यक्ष चांद बहादे, तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, तालुका उपाध्यक्ष सुरज नागोसे, तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर आणि आकाश खामनकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. तरुणांच्या या मोठ्या सहभागामुळे मारेगाव तालुक्यात मनसेची ताकद वाढली असून संघटन अधिक मजबूत झाले आहे.




