Home Breaking News सरपंचांच्या हक्कासाठी आता विशाल पारखी यांच्या हातात धुरा महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेच्या...

सरपंचांच्या हक्कासाठी आता विशाल पारखी यांच्या हातात धुरा महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेच्या वरोरा तालुका अध्यक्षपदी विशाल पारखी यांची दणदणीत निवड

चंद्रपूर :- महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. राजेंद्र कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, दहेगाव ग्रामपंचायतीचे तडफदार सरपंच  विशाल नानाजी पारखी यांची महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेच्या वरोरा तालुका अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे.
सरपंचांचे प्रलंबित प्रश्न, ग्रामपंचायतीमोरील अडचणी आणि त्यांच्या हक्काच्या लढ्याला आता अधिक आक्रमक व प्रभावी स्वरूप प्राप्त होणार असून, या नियुक्तीमुळे वरोरा तालुक्यातील सरपंच वर्गात नवचैतन्य व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



🙏मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व शुभेच्छा 🙏
या निवडीप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे विदर्भ अध्यक्ष ॲड. देवा पाचभाई, जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, जिल्हा कार्यकारणी सदस्य नर्मदाताई बोरेकर यांच्यासह वरोरा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे आदरणीय सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपસ્થितांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष विशाल पारखी यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला आणि त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
ग्रामविकासाला गती देणार – विशाल पारखी
निवडीनंतर बोलताना, “सरपंचांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. शासनाकडे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि ग्रामविकासाला नवी गती देण्यासाठी संघटित लढा तीव्र केला जाईल,” असा ठाम विश्वास नवनियुक्त तालुकाध्यक्ष विशाल पारखी यांनी यावेळी व्यक्त केला.