वरोरा :- रेल्वे स्टेशन व्यापारी मंडळातर्फे भक्तिभावाने नागपंचमी/नागमंदिर पूजन संपन्न झाले. आज 18/08/2026 रोजी महाप्रसादाची भव्य आयोजन वरोरा आहे .रेल्वे स्टेशन परिसर गजबजला “हर हर महादेव”च्या जयघोषाने रेल्वे स्टेशन व्यापारी मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात, चैतन्यात आणि धार्मिक वातावरणात रेल्वे स्टेशन चौकातील ऐतिहासिक व श्रद्धास्थान असलेल्या नागमंदिराचे विधिवत पूजन करण्यात आले. परिसरातील व्यापारी आणि भाविकांच्या उपस्थितीने हा सोहळा अत्यंत आनंदात पार पडला.
💥 मान्यवरांची विशेष उपस्थिती. 💥
या धार्मिक कार्यक्रमात लखन केशवानी,सखाराम पाऊलकर उपस्थित होते कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आणि पूजेत सहभागी होण्यासाठी व्यापारी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर, दत्तू ठाकरे, अमित घोडमारे, जब्बर भाई शेख, सुरज केशवाणी, तेजस चौधरी, महादेव झाडे, रामभाऊ धोटे ,अशोक पदाते
🙏 महाप्रसादाचे भव्य आयोजन 🙏
परंपरेची हीच वीण अधिक घट्ट करत यंदाही रेल्वे स्टेशन व्यापारी मंडळातर्फे आगामी दिनांक १८/०८/२०२७ रोजी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
👉 प्रसाद वितरण वेळ सकाळी १२:०० वाजता
(मसाला भात)
स्थळ :- रेल्वे स्टेशन चौक, नाग मंदिर परिसर
“हर हर महादेव! जय नागदार! अध्यात्मिक वसुंधरा!
रेल्वे स्टेशन व्यापारी मंडळातर्फे परिसरातील सर्व धर्मप्रेमी नागरिक, प्रवाशांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.




