Home जिल्हा मानवाने नशामुक्त जीवनशैली स्वीकारण्याची गरज – शीतल दिदी

मानवाने नशामुक्त जीवनशैली स्वीकारण्याची गरज – शीतल दिदी

वरोरा :- लोकशिक्षण संस्थेद्वारा संचालित लोकमान्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना,क्रीडा विभाग व ब्रह्माकुमारी केंद्र, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात मंगळवार,दिनांक 18 ऑगस्ट 2026 ला नशामुक्त भारत यावर मार्गदर्शन व शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.जयश्री शास्त्री( प्रभारी प्राचार्य, लोकमान्य महाविद्यालय, वरोरा) होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शितल दीदी(समन्वयक- ब्रह्माकुमारी केंद्र,चंद्रपूर) होत्या.मानवाने भौतिक सुखाच्या हव्यासापोटी व्यसनाला जवळ केले व आजार वाढविले. परंतु अजूनही बऱ्याच आजारावर पूर्ण स्वरूपात औषध उपचार नाही.अशा परिस्थितीत व देशाच्या खऱ्या विकासाकरिता प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे व इतरांनाही दूर करावे.



व्यसनात नाही म्हणण्याची सवय प्रत्येकाने लावावी.म्हणजेच मानवाने नशामुक्त जीवनशैली स्वीकारण्याची गरज आहे.या अनुषंगाने मोलाचे मार्गदर्शन शितल दीदी यांनी केले.तसेच देश व विदेश पातळीवरील ब्रह्माकुमारी केंद्राची भूमिका मांडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. जयश्री शास्त्री यांनी जेन- झी या पिढीने काय करावे व काय करू नये याबाबत बरीच उपयुक्त माहिती सांगितली.तसेच देशात सुरू असलेल्या नशामुक्त अभियानात सर्व तरुणाईने भाग घ्यावा असे आव्हान केले.याप्रसंगी या कार्यक्रमात धोटे यांनी नशामुक्तीची शपथ उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाचे संचालन कु. शिवानी पाहापळे व प्रस्ताविक डॉ. रवींद्र शेंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. देवयानी शेंडे यांनी मानले.या कार्यक्रमात ब्रह्माकुमारी केंद्र, वरोरा येथील चालेकर,भारती दीदी,उमा धोटे,पावडे व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयंसेवकांचे सहकार्य मिळाले.