गडचिरोली :-अडचणीच्या आणि संकटाच्या प्रत्येक क्षणी आपल्या माणसांसोबत सावलीसारखे उभे राहणारे लोकप्रिय व अभ्यासू आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील नेतृत्वाचा प्रत्यय दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात सर्पदंशामुळे उपचारासाठी दाखल असलेल्या विद्यार्थिनींची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.
या दौऱ्यादरम्यान, आ. राजूभाऊंनी थेट खाटांजवळ जात विद्यार्थिनींच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पालकांना धीर दिला. त्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत उपचारांचा सविस्तर आढावा घेतला.
“विद्यार्थिनींच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. त्यांना तातडीने सर्वोत्तम, गुणवत्तेचे आणि सर्वंकष उपचार मिळालेच पाहिजेत,” असे स्पष्ट निर्देश आ. राजूभाऊ तोडसाम यांनी या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
सर्पदंशासारख्या जीवघेण्या प्रसंगात रुग्णालयात दाखल झालेल्या मुलींना आणि त्यांच्या पालकांना यामुळे मोठा मानसिक आधार मिळाला असून, आ. तोडसाम यांच्या या तत्पर आणि संवेदनशील भूमिकेचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.




