Home जिल्हा ‘आरोग्यदायी शरीर, समृद्ध समाज’च्या ध्येयाने वरोरा पोलीस स्टेशन येथे मोफत आरोग्य आणि...

‘आरोग्यदायी शरीर, समृद्ध समाज’च्या ध्येयाने वरोरा पोलीस स्टेशन येथे मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

वरोरा :- स्वातंत्र्यदिनाचे पावन पर्व आणि अमृतमहोत्सवी उत्साहाचे औचित्य साधून, ‘रोटारॅक्ट क्लब ऑफ वरोरा’ यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी एका भव्य आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘उत्तम आरोग्य… उज्ज्वल भविष्य! चला, आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूया’ या प्रभावी संकल्पना व ध्येयाखाली हे शिबीर राबवले जात आहे.



💥 शिबिराची ठळक वैशिष्ट्ये व सेवा 💥
फ्री हेल्थ चेकअप संपूर्ण आरोग्य तपासणी :-  नामांकित व तज्ज्ञ डॉक्टरांकडून शरीराची संपूर्ण मोफत आरोग्य तपासणी केली जाईल.
फ्री आय चेकअप (डोळ्यांची तपासणी) :-  तज्ज्ञ नेत्रतज्ज्ञांद्वारे डोळ्यांची कसून तपासणी केली जाईल.
१০০ चष्म्यांचे मोफत वाटप :- गरजू आणि पात्र नागरिकांना शिबिरादरम्यान मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे.
💥 महत्त्वाची माहिती 💥
📅 दिनांक :-  १५ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ :-  सकाळी १०:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत
📍 स्थळ :-  पोलीस स्टेशन, वरोरा (Police Station Warora)
🙏 आयोजक 🙏
Rotaract Club of Warora** *(Service Above Self)



🙏 विशेष आव्हान 🙏
वरोरा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आयोजक ‘रोटारॅक्ट क्लब ऑफ वरोरा’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.