वरोरा :- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वरोरा शहरात आज 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 02:00 वाजता ‘तिरंगा यात्रा’ अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडली. शहीद योगेश डाहुले स्मारक, वरोरा येथून या भव्य यात्रेची सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे व शहरातील नागरिक, तरुण, विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून यात्रेत सहभाग नोंदवला. तिरंगा यात्रेचे संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिकेत नाकाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली आहे. अत्यंत शिष्ट पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेचा प्रमुख मार्ग :- शहीद योगेश डाहुले स्मारक येथून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा शहराच्या विविध प्रमुख मार्गांवरून व चौकांमधून मार्गस्थ झाली. यात्रेचा मार्ग खालीलप्रमाणे होता.
💠 शहीद योगेश डाहुले स्मारक (प्रारंभ)
💠 नेहरू चौक 💠पद्मावार चौक 💠मित्र चौक
💠 डोंगरवार चौक 💠 वीर सावरकर चौक
💠 ज्योतिबा फुले चौक💠 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (समारोप)
🙏 मान्यवर आणि सहभाग 🙏
या भव्य तिरंगा यात्रेत वरोरा मतदारसंघाचे आमदार करणदादा संजयजी देवतळे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच खालील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना, पथके व समित्यांच्या प्रतिनिधींनी आपली उपस्थिती दर्शवून राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला
💥 शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था
💥 आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा
💥 कृषी विद्यालय, वरोरा
💥 लोकमान्य विद्यालय, वरोरा
💥 अरविंद निकेतन शाळा, वरोरा
💥 संस्कार भारती शाळा, वरोरा
💥 लोया हायस्कूल, वरोरा
💥 एअर बॉर्न ट्रेनिंग सेंटर
💥 एन.सी.सी. (NCC) पथके
💥 एन.सी.सी. आनंद निकेतन, वरोरा
💥 एन.सी.सी. कृषी विद्यापीठ, वरोरा
🙏 सामाजिक, सांस्कृतिक व विविध संघटना 🙏
💠 जय जवान जय किसान माजी सैनिक संघटना
💠 गुरुदेव सेवा मंडळ 💠 योग मंडळ 💠गांधी उद्यान समिती 💠 पत्रकार संघटना 💠 व्यापारी संघटना 💠 डॉ. संघटना.
🙏जनप्रतिनिधी व नागरिक 🙏
💥 भाजपाचे संपूर्ण युवा,महिला व जेष्ठ नागरिक विविध क्षेत्रातील पदाधिकारी संपूर्ण नगरसेवक मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण वरोरा शहर “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. नागरिकांमधील हा अभूतपूर्व उत्साह आणि देशावरील प्रेम या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसून आले.




