मुंबई:- भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जमाती (ST) मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेश कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष मा. रविंद्र चव्हाणजी यांच्या सूचनांनुसार आणि मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. देवराव एम. होळी (मा. आमदार, ६८ गडचिरोली) तसेच प्रदेश महामंत्री (प्रभारी, अनु. जमाती मोर्चा, महाराष्ट्र) आ. योगेश सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या सहीने ही महत्त्वपूर्ण फेरबदल व नियुक्त्यांची यादी जाहीर झाली आहे.
या धडाकेबाज राजकीय घडामोडीत विदर्भ विभागातील चंद्रपूर जिल्ह्याची ‘सचिव’ पदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी श्री. रमेश कवडूजी मेश्राम यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीची ठळक वैशिष्ट्ये प्रदान केलेल्या पत्रकानुसार
भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जमाती (ST) मोर्चा महाराष्ट्र प्रदेश. विभाग :-विदर्भ.जिल्हा:- चंद्रपूर.पद सचिव :-श्री. रमेश कवडूजी मेश्राम.
तळागाळातील कार्यकर्त्यांची निष्ठा ओळखून आणि संघटनेचा विस्तार अधिक तीव्र करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी घेतलेला हा निर्णय चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करणारा ठरला आहे. श्री. रमेश मेश्राम यांना स्वरूपात चंद्रपूर जिल्ह्याला एक आक्रमक आणि धडाडीचे नेतृत्व लाभले असून, त्यांच्या या शानदार नियुक्तीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून व पक्षाच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे!




