Home राजकारण चलो ब्रम्हपुरी… महामोर्चा… चलो ब्रम्हपुरी… शेतकरी, कष्टकरी अन् वंचितांच्या हक्कासाठी ६ ऑगस्टला...

चलो ब्रम्हपुरी… महामोर्चा… चलो ब्रम्हपुरी… शेतकरी, कष्टकरी अन् वंचितांच्या हक्कासाठी ६ ऑगस्टला ब्रम्हपुरी तहसील कार्यालयावर भव्य ‘महामोर्चा’!

ब्रम्हपुरी :- चलो ब्रम्हपुरी… महामोर्चा… चलो ब्रम्हपुरी…
शेतकरी, कष्टकरी अन् वंचितांच्या हक्कासाठी ६ ऑगस्टला ब्रम्हपुरी तहसील कार्यालयावर भव्य ‘महामोर्चा’! काँग्रेस विधिमंडळ नेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विधिमंडळ पक्षनेते मा. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या खमक्या नेतृत्वाखाली ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, तरुण आणि सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर शासनाला जाब विचारण्यासाठी  दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी (गुरुवार) दुपारी १२:०० वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणापासून ब्रम्हपुरी तहसील कार्यालयावर एक भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या धोरणाविरोधात हा तीव्र एल्गार पुकारण्यात आला आहे.



🙏 मोर्चाच्या प्रमुख व ज्वलंत मागण्या 🙏

१). धान बोनस सन २०२५-२६ या वर्षातील शेतकऱ्यांना तात्काळ धानाचा बोनस देण्यात यावा.२). सरसकट कर्जमुक्ती २०१७ पूर्वी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती यादीत समाविष्ट करून कर्जमुक्तीचा लाभ देण्यात यावा.३).स्मार्ट मीटर बंद करा स्मार्ट मीटर लावणे तात्काळ बंद करावे आणि यापूर्वी लावलेले स्मार्ट मीटर काढून घ्यावेत.४). बारमाही पाणी उन्हाळी धानाकरिता गोसेखुर्दचे पाणी बारमाही सुरू ठेवण्यात यावे.५). आरक्षण विस्तार OBC/SC/ST यांना नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाव्यतिरिक्त OPEN प्रवर्गात सुद्धा हक्काचे आरक्षण मिळण्यात यावे.६). विद्यार्थ्यांचे हित OBC वसतिगृहातील प्रवेशासंबंधी बंद असलेले पोर्टल तात्काळ सुरू करावे, तसेच OBC विद्यार्थ्यांना पूर्ववत शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून द्यावी.७). थकीत मानधन श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे मागील ६ महिन्यांपासून थकीत असलेले मानधन तात्काळ द्यावे, तसेच बंद असलेले ऑनलाइन पोर्टल सुरू करावे.

“एकच ध्येय… शेतकरी न्यायासाठी काँग्रेस सोबत !”

महत्त्वाची तारीख दिनांक :- ६ ऑगस्ट २०२६ (वार: गुरुवार)
वेळ :- दुपारी १२.०० वाजता
सुरुवात :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण, ब्रम्हपुरी
समारोप स्थळ :- तहसील कार्यालय, ब्रम्हपुरी
🙏आवाहन 🙏
सदर महामोर्चाकरिता ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर, महिला, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, तसेच ओबीसी विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाला आपल्या शक्तीची जाणीव करून द्यावी, ही नम्र विनंती!