Home जिल्हा नारायणपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त ‘देव करते बरोबर मंडळ खांबाडा’तर्फे चहापाण्याची व्यवस्था; आ....

नारायणपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त ‘देव करते बरोबर मंडळ खांबाडा’तर्फे चहापाण्याची व्यवस्था; आ. समीरभाऊ कुन्नावार यांची सदिच्छा भेट.

खांबाडा :- पवित्र आषाढी एकादशीच्या मंगलमय पर्वावर नारायणपूर येथे भक्ती आणि सेवाभावाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘देव करते बरोबर मंडळ खांबाडा’ यांच्या वतीने विठ्ठलभक्तांसाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी विशेष चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सामाजिक व धार्मिक उपक्रमाची दखल घेत हिंगणघाट विधानसभेचे लोकप्रिय आमदार  समीरभाऊ कुनावार , वामन चंदनखेडे यांनी आवर्जून भेट देत मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.



दरवर्षी न चुकता चालत असलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील भाविकांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्या वेळी सदस्य प्रमोद चौधरी,विलास बावणे,लक्ष्मणजी भोयर, मनीष भोयर ,श्याम उरकुडे ,वसंतराव बावणे,संतोष उरकुडे,बाळू चौधरी ,आकाश भांडे,प्रफुल थुटे,नामदेव बावणे , वैभव भोयर , रुपेश वैद्य ,प्रवीण कडुकर ,हेमंत शेळके, आशिष देवतळे ,रोशन भोयर, रोशन पंढरी भोयर , गणेश गोहने, गणेश चौधरी, तुका चौधरी , मंथन उरकुडे , दादू मोहिजे , आकाश भोयर, लकी तांदूळकर, प्रेम नैताम , गजानन धोटे, शालिक भोयर हे उपस्थित होते.



मंदिराचे कमिटी मेंबर हर्षल पुसदेकरनिवृत्ती खडसे यांनी आमदार समीरभाऊ कुनावार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची माहिती पदाधिकाऱ्यांनी आमदारांना दिली. आमदार साहेबांनी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावाची प्रशंसा केली आणि विठ्ठलचरणी लीन होत सर्वांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात.



विठू नामाचा जयघोष आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीने नारायणपूर येथील परिसर पूर्णपणे दुमदुमून गेला होता. याप्रसंगी परिसरातील नागरिक, भाविक व ‘देव करते बरोबर मंडळ खांबाडा’चे तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.