Home जिल्हा पर्यावरण रक्षणाचा वसा: वरोऱ्यात २५ जुलैपासून ‘वृक्षारोपण प्रेरणा सप्ताह’ उत्साहात सुरू.

पर्यावरण रक्षणाचा वसा: वरोऱ्यात २५ जुलैपासून ‘वृक्षारोपण प्रेरणा सप्ताह’ उत्साहात सुरू.

मुंबई शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या हस्ते उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव.शिवसेना पक्षप्रमुख उद्धवराव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आयोजन.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिक्षक सेनेच्या वतीने वरोरा येथे ‘वृक्षारोपण प्रेरणा सप्ताहाचा‘ दणदणीत शुभारंभ २५ जुलै रोजी होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त (२७ जुलै) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मुंबई शिक्षक आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष मा. ज. मो. अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे.



शिक्षक सेना गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात वृक्षारोपण प्रेरणा सप्ताह राबवत आहे. या माध्यमातून लाखो वृक्षांची लागवड करून त्यांचे यशस्वी संगोपन व संवर्धन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी उत्कृष्ट वृक्षारोपण व संवर्धन कार्याबद्दल चंद्रपूर जिल्ह्याचा मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला होता.
यंदा चंद्रपूर जिल्ह्यात हा उपक्रम शिवसेना जिल्हा संघटक, वरोरा नगरसेवक तथा सभापती श्री. मनीष जेठानी तसेच शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष श्री. राजेश नायडू यांच्या नेतृत्वाखाली वरोरा येथे आयोजित करण्यात आला आहे.



💥 कार्यक्रमाची रूपरेषा 💥
👉 उद्घाटन सोहळा :-शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता.स्थळ :- अभ्यंकर स्कूल परिसर, वरोरा.
🙏 प्रमुख उपस्थिती🙏

शिक्षक सेना विभागाध्यक्ष  श्री. गंगाधर नाकाडे .
एकत्र येण्याची वेळ व ठिकाण :-१०:०० वाजता, शिवसेना जनसंपर्क कार्यालय, मेन रोड, वरोरा.
या कार्यक्रमात वरोरा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मा. ज. मो. अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच ते शिक्षक सेना पदाधिकारी, शिक्षक, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना पर्यावरण संरक्षण, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
पर्यावरण रक्षणाच्या या पवित्र कार्यात परिसरातील सर्व शिक्षक, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. मनीष जेठानी आणि श्री. राजेश नायडू यांनी केले आहे.