Home Breaking News दिला शब्द, केला पूर्ण..! वरोरात 22 जुलै रोजी ऐतिहासिक ‘निवासी पट्टे वाटप’...

दिला शब्द, केला पूर्ण..! वरोरात 22 जुलै रोजी ऐतिहासिक ‘निवासी पट्टे वाटप’ सोहळा.

वरोरा :-प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत शासनाच्या जागेवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याच्या प्रक्रियेला वरोरा शहरात प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा संजयजी देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या 22 जुलै 2026 रोजी भव्य ‘निवासी पट्टे वाटप’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आमदार करणदादा देवतळे यांनी पाठपुरावा करून नागरिकांना दिलेला शब्द आता प्रत्यक्षात पूर्ण केला आहे, ज्यामुळे वरोरा शहरातील शेकडो नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे.



 🟡 कार्यक्रमाची सविस्तर माहिती 🟡
कार्यक्रमाचे नाव :- निवासी पट्टे वाटप सोहळा (प्रधानमंत्री आवास योजना – शहरी अंतर्गत)
प्रमुख उपस्थिती :- आमदार करणदादा संजयजी देवतळे (वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र)
⭕ दिनांक :- 22/07/2026
⭕ वेळ :- सकाळी  11:00  वाजता
⭕ स्थळ :- स्व. दादासाहेब देवतळे शेतकरी भवन, वरोरा.
 🟡 बातम्यातील ठळक मुद्दे 🟡
अतिक्रमण पट्टे वाटप प्रक्रियेस सुरुवात :-वरोरा शहरातील शासकीय जागेवरील (वनजमीन सोडून) 1/1/2011  पूर्वीचे निवासी अतिक्रमण धारकांचे पट्टे नियमीत करण्यास सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात 105 पट्टे मंजूर करण्यात आले आहेत.
गुंठेवारी कायदा अंतर्गत नियमीतीकरण :- शहरातील सन 2020 पूर्वीची खरेदी प्रक्रिया झालेली निवासी प्लॉट्स गुंठेवारी कायदा अंतर्गत नियमित करण्याच्या प्रक्रियेलाही आता गती मिळाली आहे.
नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण :-आमदार करणदादा देवतळे यांच्या प्रयत्नांमुळे कायदेशीर व अधिकृत मालकी हक्क मिळत असल्याने वरोरा शहरातील नागरिकांमध्ये आणि लाभार्थ्यांमध्ये आनद व उत्साहाचे वातावरण आहे.
“दिला शब्द, केला पूर्ण..!” या उक्तीप्रमाणे आमदार करणदादा देवतळे यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघातील जनतेशी साधलेला सुसंवाद आणि विकासाचा व वचनाचा दिलेला प्रत्यय या ऐतिहासिक उपक्रमातून पुन्हा एकदा दिसून येत आहे. कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी व लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.