नवी दिल्ली:- देशात जनगणनेचे काम सुरू झाले असतानाच, आता सायबर भामट्यांनी याकडे आपला मोर्चा वळवला आहे. जनगणनेच्या नावाखाली सामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत असून, नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
🙏 नेमकी काय आहे भामट्यांची युक्ती 🙏
काही ठिकाणी बनावट कर्मचारी घराघरात जाऊन लोकांकडे मोबाईलवरील ‘ओटीपी’ (OTP) मागत आहेत. अनेक नागरिक गोंधळून आपला ओटीपी शेअर करत आहेत. लक्षात ठेवा, एक ओटीपी शेअर केल्यास तुमचे बँक खाते काही मिनिटांत रिकामे होऊ शकते.
💥 काय खबरदारी घ्याल 💥
जनगणना संचालकांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता स्पष्ट केले आहे की
ओटीपी मागू नका :- कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला ओटीपी शेअर करू नका. कोणताही सरकारी कर्मचारी ओटीपी मागत नाही.
👉 ओळखपत्र तपासा :-जर कोणी कर्मचारी म्हणून घरी आला, तर त्याचे अधिकृत ओळखपत्र आणि क्यूआर कोड (QR Code) तपासा.
⭕ संशय आल्यास तक्रार करा :- जर तुम्हाला कर्मचाऱ्यावर संशय येत असेल, तर त्यांना माहिती देण्यास नकार द्या आणि तातडीने प्रशासनाला कळवा.
‘जनगणनेच्या कामात पारदर्शकता आहे, पण सावधगिरी हीच आपली सुरक्षा आहे.’ त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आपली खाजगी माहिती देऊ नका.




