Home Breaking News छात्र शक्ती हीच राष्ट्र शक्ती!’ – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ७८ वा...

छात्र शक्ती हीच राष्ट्र शक्ती!’ – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ७८ वा वर्धापन दिन उत्साह.

महाराष्ट्र :- राष्ट्र प्रथम, विद्यार्थी हित आणि समाज परिवर्तन या त्रिसूत्रीवर आधारित वाटचाल अविरत सुरू!
‘ज्ञान, शीळ आणि एकता’ या ब्रीदवाक्याचा अंगीकार करत, देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (ABVP) ७८ वा स्थापना दिन आज अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतो “छात्र शक्तीला राष्ट्र शक्तीत रूपांतरित करण्याचा” संकल्प घेऊन निघालेला अभाविपचा हा ऐतिहासिक प्रवास आज ७८ व्या वर्षात पदार्पण करत असताना, हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रभक्तीच्या जोशात हा दिवस साजरा केला.




💥 क्रांतिकारी विचारांचा वारसा 💥
देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक समस्या आणि राष्ट्रहित यांसाठी अभाविप गेली ७८ वर्षे सातत्याने संघर्ष करत आहे. “राष्ट्र प्रथम, विद्यार्थी हित आणि समाज परिवर्तन” हे केवळ शब्द नसून, हे अभाविपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या रक्तातील बाणा आहे. आजच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येतो




💥  संकल्पाची नवी पहाट 💥
देशभक्तीचा महासागर :- सोशल मीडियावर आज दिवसभर अभाविपच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छांचा आणि तिरंग्यासोबतच्या पोस्टचा महापूर दिसून आला. ‘छात्र शक्ती – राष्ट्र शक्ती’ अशा घोषणांनी सोशल मीडिया दुमदुमून गेला होता. आपल्या कार्याचा अभिमान बाळगत अभाविपच्या लाखो कार्यकर्त्यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली एकजूट आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ७८ व्या स्थापना दिनानिमित्त आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त समस्त कार्यकर्त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! ही संघटना अशीच उत्तरोत्तर प्रगती करो, हीच सदिच्छा.
🚩 अभाविप जिंदाबाद 🚩