Home Breaking News स्मार्ट मीटरच्या सक्तीला लगाम! महावितरणची माघार, ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवणे आता बेकायदेशीर...

स्मार्ट मीटरच्या सक्तीला लगाम! महावितरणची माघार, ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवणे आता बेकायदेशीर !

वरोरा :-⚡ स्मार्ट मीटरच्या सक्तीला लगाम! महावितरणची माघार, ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवणे आता बेकायदेशीर! ⚡ वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर लादली जाणारी सक्ती आता मोडीत निघाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महावितरणने मांडलेल्या भूमिकेमुळे ग्राहकांच्या हक्कांचा विजय झाला आहे.अनेक भागांत “४८ तासांत स्मार्ट मीटर बसवले जाणार” अशा धमक्या देऊन ग्राहकांमध्ये भीती पसरवली जात होती. मात्र, आता महावितरणने न्यायालयात स्पष्ट केले आहे की, स्मार्ट मीटर बसवणे हे ग्राहकांसाठी बंधनकारक नसून पूर्णपणे ऐच्छिक आहे.




💠 ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना 💠
संमतीशिवाय काहीही नको :- कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी तुमच्या संमतीशिवाय जबरदस्तीने मीटर बदलू शकत नाही.




💠 दबावाला बळी पडू नका 💠अशा प्रकारची सक्ती झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे थेट तक्रार करा आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करा.




💠 जागरूक राहा 💠मीटर बदलण्यापूर्वी त्याबाबतची संपूर्ण माहिती मागवून घ्या आणि कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या अफवांना थारा देऊ नका.

🙏स्वातंत्र्य विदर्भ न्यूज पोर्टलचे, वरोरा आवाहन🙏

👉 आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी जागरूक राहा आणि ही माहिती आपल्या मित्र-परिवारापर्यंत पोहोचवून त्यांनाही सावध करा.
तुमच्या भागात स्मार्ट मीटरबाबत अशी काही जबरदस्ती होत आहे का? कमेंट्समध्ये नक्की कळवा!