वरोरा :- भारतीय जनता पार्टी चे गटनेते व नगरसेवक अक्षय दिलीप भिवदरे यांचे वडील तथा वरोरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे खंदे कार्यकर्ते श्री. दिलीपजी दादाजी भिवदरे यांचे आज निधन झाले. यांनी आपल्या कार्यकाळात शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले होते. एक अभ्यासू आणि लोकहितासाठी नेहमी आग्रही असणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. तसेच त्यांचे वडील दादाजी भिवदरे हे माजीनगरसेवक होते. भिवदरे परिवाराने नेहमी समाजसेवा करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या तीनपिढी पासून फक्त समाजसेवा हाच ध्येय भिवदरे परिवाराने केला.असून आज त्यांच्या निधनामुळे शहरात शोककळा पसरली असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
👉 अंत्यविधी :- उद्या, दिनांक 20 जून 2026 रोजी सकाळी 10 : 00 वाजता “हिंदू स्मशानभूमी”, वरोरा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अशा या समाजसेवकास स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल, वरोरा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏




