Home Breaking News अवकाशातील ज्ञानाचा ‘लिटिल जीनियस’! सात वर्षांच्या अजिंक्य फटाले यांची जागतिक विक्रमासह ‘जीनियस...

अवकाशातील ज्ञानाचा ‘लिटिल जीनियस’! सात वर्षांच्या अजिंक्य फटाले यांची जागतिक विक्रमासह ‘जीनियस इंडियन अचिव्हर्स अवॉर्ड’वर मोहोर

वरोरा :- केवळ सात वर्षांचे वय, पण डोळ्यात विश्वाची स्वप्ने आणि मेंदूत सूर्यमाला व अंतराळ प्रणालीचे (Space System) अथांग ज्ञान! आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर अवघ्या सातव्या वर्षी जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या अंतराळविषयक प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन चि. अजिंक्य प्रविण फटाले याने जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याच्या या अभूतपूर्व कामगिरीची दखल घेत जीनियस फाऊंडेशन, अहमदाबाद (गुजरात)  तर्फे त्याला प्रतिष्ठेच्या जीनियस इंडीयन अचिव्हर्स अवॉर्ड २०२६’ ने सन्मानित करण्यात आले आहे.
काय आहे अजिंक्यची ही विक्रमी भरारी ?
अजिंक्यने अंतराळ विज्ञानातील अत्यंत क्लिष्ट आणि कठीण प्रश्नांच्या उत्तरांमध्ये प्रभुत्व मिळवून ही जागतिक कामगिरी केली आहे. अवघ्या ७ व्या वर्षी सूर्यमाला, ग्रहांची रचना आणि अंतराळ प्रणालीवरील कठीण प्रश्नांची उत्तरे देणारी तो जगातील एकमेव व्यक्ती ठरला आहे. त्याच्या या अचूकतेने आणि अल्पवयातील व्यासंगामुळे जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
‘जीनियस इंडीयन अचिव्हर्स अवॉर्ड’ने गौरव
अजिंक्यच्या या अद्वितीय बुद्धिमत्तेचा आणि त्याच्या खडतर परिश्रमाचा सन्मान म्हणून अहमदाबाद येथील प्रतिष्ठित ‘जीनियस फाऊंडेशन’ने त्याला ‘जीनियस इंडीयन अचिव्हर्स अवॉर्ड २०२६’ देऊन गौरविल आहे. हे पुरस्कार अशा प्रतिभावान व्यक्तींना दिले जाते, ज्यांनी अत्यंत कमी वयात आपल्या क्षेत्रात शिखर गाठले आहे.
यशाचा नवा किरण
एका छोट्या वयात अंतराळासारख्या गूढ आणि विशाल विषयाचा सखोल अभ्यास करून जागतिक विक्रम करणे ही अजिंक्यच्या जिज्ञासू वृत्तीची आणि त्याच्या पालकांच्या मार्गदर्शनाची मोठी फलश्रुती आहे. अजिंक्यच्या या यशामुळे आज संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्वस्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
चि. अजिंक्य प्रविण फटाले यांचे या उत्तुंग यशाबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!