सावली (चंद्रपूर) :- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची अवैध निर्मिती आणि विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटवर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि सावली पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई केली आहे. मौजा रयतवारी येथे ११ जून २०२६ रोजी केलेल्या या कारवाईत तब्बल ११ लाख ११ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अशी होती गुन्हेगारीची कार्यपद्धती
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी विजय भिमाजी भांडेकर (वय ३३ वर्षे, रा. साखरा बु., सावली) हा आपल्या घरी प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा करून मशिनच्या सहाय्याने बनावट (ड्युप्लिकेट) तंबाखू तयार करत होता. हा माल तो बाजारात विक्रीसाठी पाठवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कारवाईत जप्त केलेले साहित्य
छाप्यादरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला:
👉 HOLA आणि EAGLE ब्रँडचा हुक्का शिशा तंबाखू
👉 खुला सुगंधी तंबाखू आणि पॅकेजिंगचे साहित्य
👉 तंबाखू उत्पादन आणि पॅकेजिंगसाठी वापरली जाणारी मशिन
एक वाहन (क्रमांक MH-34-CJ-9625)
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने हा कच्चा माल विनय गुप्ता (रा. गोकुल नगर, गडचिरोली) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमान्वये सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
Home Breaking News सावलीत अवैध तंबाखू साम्राज्याचा पर्दाफाश: ११ लाखांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांची धडाकेबाज कारवाई




