पुणे :- महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्टी आणि शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.
शाळा सुरू होण्याबाबतचे नवीन आदेश
उर्वरित महाराष्ट्र :- राज्यातील विदर्भ वगळता इतर सर्व भागांतील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार, दिनांक १५ जून २०२६ पासून नियमित वेळेत सुरू होतील.
विदर्भ :- विदर्भतील वाढत्या तापमानाचा विचार करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने, विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आता सोमवार, दिनांक २२ जून २०२६ पासून सुरू होणार आहेत.
विदर्भातील शाळांच्या वेळा :-
विदर्भातील शाळा दिनांक २२ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत सकाळच्या सत्रात भरतील, तर दिनांक १ जुलै २०२६ पासून या शाळा नियमित वेळेत भरतील.
शिक्षण संचालनालयाने निर्गमित केलेल्या या आदेशाची सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.




