वरोरा :- वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी गावाने शेतीमध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे. येथे उत्पादित होणारे हळदीचे बियाणे आता महाराष्ट्रातील ‘उत्तम दर्जाचे बियाणे’ म्हणून ओळखले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रगतशील शेतीला चालना देण्यासाठी व शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वासुमना पंत (आयएएस ) या उपस्थित राहणार असून विशेष ‘हळद संशोधन दौरा’ आहे
मार्गदर्शनाचा मुख्य उद्देश: शेती ते प्रक्रिया उद्योगापर्यंतचा प्रवास
या दौऱ्यादरम्यान आयोजित १ तासाच्या विशेष सत्रात तज्ज्ञांकडून खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे:
विक्रमी उत्पादन :- हळदीचे भरघोस उत्पन्न कसे घ्यावे?
योग्य बाजारभाव उत्पादनाला जास्तीत जास्त भाव मिळवण्यासाठी मार्केटिंगच्या आधुनिक टिप्स.
मूल्यवर्धन (Value Addition) गावातच हळदीचे विविध पदार्थ (प्रॉडक्ट्स) कसे तयार करावेत, यावर सविस्तर मार्गदर्शन.
बोडखा मोकाशीची हळद ठरतेय ब्रँड
गावातील ‘चिडे बंधू हळद पावडर’ आणि ‘प्रगती शेतकरी गट हळद पावडर’ यांच्या दर्जेदार उत्पादनांमुळे बोडखा मोकाशीच्या हळदीला बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण झाली आहे. आपल्या गावची ही यशस्वी ओळख आता अधिक विस्तारायची आहे.
सविस्तर माहिती
दिनांक :05/06/2026
वेळ :- सकाळी 10:00 वाजता
मार्गदर्शक :- इंजि. गणेश चिडे, प्रकाश कामडी, डॉ. राऊत आणि विठ्ठल कोसूरकर.
शेतकऱ्यांसाठी आवाहनात्मक संदेश
हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. आपली शेती आधुनिक करण्यासाठी आणि उत्पादनातून थेट नफा मिळवण्यासाठी या दौऱ्यात व मार्गदर्शनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




