Home Breaking News झरीजामणीच्या शेतरस्त्यांचा होणार कायापालट; ‘मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजने’ला गती!

झरीजामणीच्या शेतरस्त्यांचा होणार कायापालट; ‘मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजने’ला गती!

झरीजामणी :- शेतकऱ्यांचा प्रवास आता सुखकर होणार असून, त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी आता पक्के पांदण रस्ते उपलब्ध होणार आहेत. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजने’अंतर्गत झरीजामणी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी आज तहसील कार्यालयात उपविभागीय स्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी मा. रेवैयाह डोंगरे (IAS) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तालुक्यातील शेतरस्त्यांच्या कामांचे नियोजन आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.

​शेतकऱ्यांचा शेतमाल वेळेत बाजारात पोहोचण्यासाठी आणि शेतीची कामे विनाअडथळा पूर्ण करण्यासाठी दर्जेदार रस्त्यांची गरज ओळखून, या बैठकीत पहिल्या टप्प्यातील रस्त्यांची निश्चिती, क्लस्टर फॉर्मेशन (Cluster Formation) आणि निविदा प्रक्रियेवर सखोल चर्चा करण्यात आली. या वेळी तहसीलदार रासने जी, सासोली जी, संतोषभाऊ माहूरे, सतिश आदेवार, विनोद उप्परवार, अशोक पंधरे, दयाशंकर गेडाम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

                    🙏 जय विदर्भ 🙏