Home Breaking News करंजी घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपाचा उत्साहात शुभारंभ !आमदार करणदादा देवतळे...

करंजी घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपाचा उत्साहात शुभारंभ !आमदार करणदादा देवतळे यांच्या हस्ते योजनेचा प्रारंभ; लाभार्थ्यांचा आर्थिक भार हलका होणार.

वरोरा :-ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. याच भूमिकेतून घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्य 🙏मोफत रेती वाटप योजनेचा धडाक्यात शुभारंभ🙏 करण्यात आला. वरोरा जवळील करंजी रेती घाटावरून मा. आमदार करणदादा देवतळे यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ उत्साहात पार पडला.
या योजनेमुळे तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या हक्काच्या घराचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे.
‼️प्रशासनाने तत्परतेने कार्य करावे: आमदार करणदादा देवतळे‼️
‼️ “सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करताना त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाने अत्यंत तत्परतेने आणि पारदर्शकतेने कार्य करावे. मोफत रेती वाटपामुळे लाभार्थ्यांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होणार असून, रखडलेली घरकुलांची कामे आता अधिक वेगाने पूर्ण होतील.”
करणदादा देवतळे (आमदार)भद्रावती – वरोरा निर्वाचन क्षेत्र

🙏प्रमुख मान्यवरांची उपस्थिती🙏
या गरिबाभिमूख कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने:
👉 सौ. अर्चनाताई आशिष ठाकरे (नगराध्यक्षा, वरोरा नगर परिषद)
👉 श्री. भस्के साहेब (उपविभागीय अधिकारी)
👉 श्री. कौटकर साहेब (तहसीलदार)
👉 श्री. मुंडकर साहेब (गट विकास अधिकारी)
यांच्यासह स्थानिक नेते व पदाधिकारी बाळूजी भोयर, देविदासजी ताजने, सुजितजी कष्टी, प्रभाकरजी कष्टी, निलेशजी मिलमिले, रामदासजी गाडगे, प्रशासनातील इतर अधिकारी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी उपस्थित होते.
🙏 लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण 🙏
शासनाच्या या लोकहितकारी आणि थेट गरिबांना फायदा पोहोचवणाऱ्या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. रेतीचे गगनाला भिडलेले भाव पाहता, घरकुल मंजुरी मिळूनही अनेक कुटुंबांना बांधकामाचा खर्च पेलवत नव्हता. मात्र, आता थेट घाटावरूनच मोफत रेती मिळणार असल्याने लाभार्थ्यांनी शासनाचे आभार मानत अत्यंत समाधान व्यक्त केले आहे. गरजूंचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन सातत्याने पावले उचलत असल्याचा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
👉 घरकुलयोजना,मोफतरेती,वरोरा,विकासकाम भद्रावती – वरोरा निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे.

🙏 जय विदर्भ 🙏