वरोरा :-आनंदवन येथील पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन (पं.स. वरोरा) येथे दि. २ मे ते ६ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले पाच दिवसीय उन्हाळी शिबिर अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
‼️ शिबिराचे उद्घाटन ‼️
शिबिराचा शुभारंभ शनिवार, २ मे रोजी सकाळी ७:०० वाजता माननीय श्री विलास भाऊ नेरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांतजी बोथले होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रेमदास हेमने व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
🙏पाच दिवसांचा भरगच्च कार्यक्रम🙏
हे शिबिर दररोज दोन टप्प्यात घेण्यात आले. सकाळी ७:०० ते ९:०० या वेळेत मैदानी व साहसी खेळ, तर ९:३० ते ११:३० या वेळेत कला व सांस्कृतिक कार्यशाळा पार पडल्या.
👉 क्रीडा विभाग :- अमोल आवारी, आदित्य दवे, पंकज शेंडे (बॉक्सिंग), घनश्याम खोंडे (कराटे) आणि कोमल चांदेकर यांनी विद्यार्थ्यांना १०० मीटर रनिंग, व्हॉलीबॉल, कबड्डी, तायक्वांदो, खो-खो, स्किपिंग, बॅडमिंटन आणि मलखांब यांसारख्या खेळांचे उत्तम प्रशिक्षण दिले.
👉 कला व सांस्कृतिक विभाग सिद्धार्थ खोब्रागडे (कला), भोयर मॅडम (नृत्य) आणि उर्मिला बंदुकवार (कार्यानुभव) यांनी विद्यार्थ्यांना चित्रकला, रेखाचित्र, भरतनाट्यम, हस्तकला, कागदापासून विविध कलाकृती व पुष्पगुच्छ बनवणे, मातीकाम आणि स्केचिंगचे बारकावे शिकवले. तसेच वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्याची चाचणी घेण्यात आली.
🛑 विशेष भेट 🛑
शिबिराच्या चौथ्या दिवशी, ५ मे रोजी सकाळी ९:०५ वाजता जिल्हा परिषद चंद्रपूरच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांनी शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले व मार्गदर्शन केले.
🙏 निरोप समारंभ 🙏
शिबिराचा सांगता समारंभ ६ मे रोजी सकाळी १०:०० वाजता पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक नगाजी साळवे सर होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत बोथले, सदस्य प्रेमदास हेमने आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
👉 मुख्याध्यापक नगाजी साळवे यांनी आपल्या भाषणात शिबिराच्या यशाचे श्रेय शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला दिले. पालकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हे शिबिर यशस्वी होऊ शकले, असे सांगत त्यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.
या उन्हाळी शिबिरामुळे आनंदवन परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.
🙏 जय विदर्भ🙏




