Home जिल्हा वरोरा नगरपरिषदेचा ‘आंधळा’ कारभार! ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी गटारात; नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे...

वरोरा नगरपरिषदेचा ‘आंधळा’ कारभार! ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी गटारात; नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे लहान मुलांच्या जीवावर बेतण्याची भीती

वरोरा :-एकीकडे विदर्भात सूर्याचा पारा वाढत असताना आणि अनेक भागांत पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना, वरोरा नगरपरिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. शहरातील राजीव गांधी चौकात.गेल्या चार दिवसांपासून पाण्याचा व्हॉल्व्ह खराब झाला असून, त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून थेट गटारात जात आहे. विशेष म्हणजे, हे पाणी रोखण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.
पाण्याचा व्हॉल्व्ह खराब, पण दुरुस्तीला मुहूर्त मिळेना!
मिळालेल्या माहितीनुसार, राजीव गांधी चौकातील मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह चार दिवसांपूर्वी उघडण्यात आला होता. मात्र, त्याचे ‘थ्रेडिंग’ किंवा चूडा खराब झाल्यामुळे तो आता बंद होत नाहीये. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मते दुरुस्तीचे काम सुरू आहे, पण चार दिवस उलटूनही पाण्याचा हा ‘धबधबा’ थांबलेला नाही. दररोज सुमारे १००० ते १५०० लिटर शुद्ध पाणी** रस्त्यावरून वाहून वाया जात आहे.
👉 जीवघेणा खड्डा :-कोणाच्या बळीची वाट पाहताय.
केवळ पाण्याची नासाडीच नाही, तर या दुरुस्तीसाठी नगरपरिषदेने रस्त्याच्या मधोमध एक प्रचंड मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. या खड्ड्याची खोली इतकी आहे की एखादा पूर्ण वाढलेला माणूस त्यात सहज गडप होऊ शकतो.
👉 शाळकरी मुलांचा जीव धोक्यात या परिसरात शाळा असल्याने लहान मुलांची सतत ये-जा असते. हा खड्डा उघडा असल्याने आणि बाजूला सांडपाणी साचले असल्याने एखादा अपघात होऊन लहान मूल त्यात पडल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
👉 ठेकेदाराचा आणि प्रशासनाचा मनमानी कारभार कोणतीही सुरक्षिततेची साधने न लावता किंवा बॅरिकेड्स न टाकता अशा प्रकारे खड्डा उघडा ठेवणे हा नगरपरिषदेचा आणि संबंधित ठेकेदाराचा शुद्ध निष्काळजीपणा असल्याचे दिसून येत आहे.
⭕जनतेचा आक्रोश⭕

🙏   भारतीय जनता पार्टीचे गटनेते तथा नगरसेवक गणेश भीवदरे  त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असा थेट संदेश.

👇”प्रशासन ढिम्म, 👇
स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या संतापानुसार, “प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. उन्हाळ्यात पाणी जपून वापरण्याचे आवाहन करणाऱ्या नगरपरिषदेला स्वतःच्या डोळ्यासमोरून वाहून जाणारे हजारो लिटर पाणी दिसत नाही का? एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का?”
या प्रकरणी वरोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून व्हॉल्व्ह दुरुस्त करावा आणि तो जीवघेणा खड्डा बुजवावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, संतप्त नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
👉 बातमी आपल्या सोशल मीडियावर शेअर करा आणि प्रशासनाला जागे करा !

🙏 जय विदर्भ 🙏