Home जिल्हा बल्लारपुरात घुमणार कामगारांचा आवाज! ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत होणार कामगार नेत्यांचा...

बल्लारपुरात घुमणार कामगारांचा आवाज! ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत होणार कामगार नेत्यांचा भव्य सत्कार

बल्लारपूर :-ज्यांच्या घामातून राष्ट्राची प्रगती आकाराला येते, त्या श्रमशक्तीचा सन्मान करण्यासाठी आणि हक्क अबाधित राखण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीने उद्या, १ मे रोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘जागतिक कामगार दिना’चे औचित्य साधून राज्याचे माजी मंत्री मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख कामगार नेत्यांचा विशेष सत्कार सोहळा पार पडणार आहे.
🟡 बल्लारपुरात कामगारांचा जागर !🟡
कामगारांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या सुधीरभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा कार्यक्रम केवळ सत्कार सोहळा नसून, कामगार शक्तीचे सामर्थ्य दाखवणारा ‘कामगार मेळावा’ ठरणार आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील लढाऊ कामगार नेत्यांना सन्मानित करून त्यांच्या कार्याला सलाम केला जाईल.
🙏 कार्यक्रमाचा तपशील 🙏
👉 दिनांक :- १ मे, शुक्रवार
👉 वेळ :- दुपारी ठीक १२:०० वाजता
👉 स्थळ :-शासकीय विश्रामगृह (PWD), बल्लारपूर

🔴 आयोजक आणि प्रमुख उपस्थिती
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी 🔴

👉 भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस :-अजय दुबे,

👉जिल्हाध्यक्ष :- उमेशभाऊ बोढेकर

👉 शहराध्यक्ष :- श्रीनिवास कोलावार

यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले आहेत.
“श्रम हीच खरी संपत्ती आहे. कामगारांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

बल्लारपूरच्या या भूमीत कामगारांच्या सन्मानाचा हा भव्य सोहळा ऐतिहासिक ठरणार असून, संपूर्ण शहरात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे.

🙏 जय विदर्भ 🙏