Home जिल्हा चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकपदी ‘सिंघम’ आयूष नोपाणी यांची वर्णी; अवैध धंद्यांविरुद्ध पुकारणार एल्गार...

चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकपदी ‘सिंघम’ आयूष नोपाणी यांची वर्णी; अवैध धंद्यांविरुद्ध पुकारणार एल्गार !

चंद्रपूर :-अभिषेक किशोरराव भागडे
चंद्रपूर जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा आता तरुण आणि तडफदार आयपीएस अधिकारी आयूष नोपाणी यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. मावळते पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची अहिल्यानगर येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी आयूष नोपाणी यांची नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वरोरा उपविभागातील ‘सिंघम’ पुनरागमन
आयूष नोपाणी यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपविभागात आपल्या धडाकेबाज कारवायांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच त्यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून होणाऱ्या नियुक्तीला सोशल मीडियावर “सिंघम रिटर्न”असे संबोधले जात आहे. यापूर्वी त्यांनी जालना येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वीरीत्या काम पाहिले आहे.
👉 कार्याचा धडाका आणि अनुभव
नोपाणी यांच्या कार्यकाळात अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जालन्यात असताना त्यांनी 👉अवैध सावकारी आणि किडनी विक्री प्रकरणाच्या महत्त्वाच्या तपासात अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कामाची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत
👉 अवैध धंद्यांवर प्रहार :- वाळू तस्करी, अवैध दारू विक्री, जुगार आणि सट्टेबाजी विरुद्ध त्यांनी नेहमीच कठोर पावले उचलली आहेत.
👉 जनतेचे पोलीस :- तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देणे आणि पोलीस-जनता संवादाला प्राधान्य देणे ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे.
👉 नियोजनबद्ध अंमलबजावणी अचूक नियोजन, गुप्त माहितीचे जाळे आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी ते ओळखले जातात.
👉 चंद्रपूरमधील नवी आव्हाने
जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यानंतर नोपाणी यांच्यासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. विशेषत : चंद्रपूर महानगरात वाढत चाललेले ड्रग्जचे जाळे उद्ध्वस्त करणे हा त्यांच्या नवीन इनिंगमधील सर्वात महत्त्वाचा आणि आव्हानात्मक विषय ठरेल. यासोबतच जिल्ह्यातील कोळसा आणि वाळू माफियांवर ते कशा प्रकारे वचक निर्माण करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
💥 “कायद्याचा धाक आणि जनतेचा विश्वास” हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या आयूष नोपाणी यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्हा अधिक सुरक्षित होईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.

🙏 जय विदर्भ 🙏