वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीचे औचित्य साधून आज त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या मंगल प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत करणदादा देवतळे यांच्या हस्ते गरजू व नागरिकांसाठी ‘मसाले भात’ वाटप उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
समता आणि सेवाभावाचा संदेश
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवाभाव आणि समतेचा विचार पोहोचावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. महात्मा फुले यांनी आयुष्यभर ज्या सामाजिक समता, शिक्षण आणि न्यायासाठी लढा दिला, त्याच विचारांतून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी सदैव कार्य करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
-: मान्यवरांची उपस्थिती :-
या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये प्रामुख्याने:
👉 ज्येष्ठ नेते बाबासाहेब भागडे (माजी नगरसेवक), मनोहरजी स्वामी, विलास दारापूरकर, जगदीश तोटावार.
भाजप पदाधिकारी संतोष पवार (शहराध्यक्ष तथा नगरसेवक), अनिकेत नाकाडे (युवा मोर्चा शहराध्यक्ष).
👉 माजी नगरसेवक व नेते :- दिलीपभाऊ घोरपडे, बंडूभाऊ लभाने, संजय गयनेवार, संजय दानव, सचिन तडस, अमित आसेकर, प्रवीण चिमूरकर, राजूभाऊ राजुर्डे.योगेश मारोडकर. भारत कामडी, शब्बीर शेख, लटारी पिगे, आशिष कोकाटे, गफार शेख,
👉 नगरसेविका :- नुपूर तेला, लीना गयेनेवार, मनीषा दानव, लता हिवरकर.
👉 विषेश सहभाग :- कावळकर सर, सपाटे सर, राहुलभाऊ बांदुरकर.
🔴 नियोजन आणि परिश्रम 🔴
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप नगरसेवक तथा गटनेते गणेश भिवदरे, संजय नरुले यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवाराने, तसेच गणेश मंडळ, दुर्गा मंडळ आणि इतर मित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
👉 “महात्मा फुले यांचे विचार हे केवळ वाचनापुरते मर्यादित न ठेवता, ते कृतीत आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आजचा हा उपक्रम समाजाला जोडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.”
🔴🔴🔴 करणदादा देवतळे 🔴🔴🔴
महात्मा फुले यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि समाजहितासाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.
🙏 जय विदर्भ🙏




