वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
भीषण उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रवाशांची तहान भागवण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून स्वर्गीय श्यामसुंदर कन्हैयालाल तेला यांच्या स्मृतिपित्यर्थ वरोरा बस स्थानक परिसरात भव्य पाणपोईचे आयोजन करण्यात आले आहे. या पाणपोईचा उद्घाटन सोहळा वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. श्री. करणदादा देवतळे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
भरतभाऊ तेला यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाद्वारे उन्हाळ्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांना व प्रवाशांना शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्व. श्यामसुंदरजी तेला यांच्या आठवणींना उजाळा देत सामाजिक सेवेचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
🔴 कार्यक्रमाचा तपशील 🔴
👉 दिनांक :-१२ एप्रिल २०२६ (रविवार)
👉 वेळ : – सकाळी ठीक ११:०० वाजता
👉 स्थळ : – एस. बस स्टॅन्ड परिसर, वरोरा
🔴 विशेष आवाहन 🔴
👉 या लोकार्पण सोहळ्याला वरोरा शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती श्री. भरत श्यामसुंदरजी तेला यांनी केली आहेत.
🙏 जय विदर्भ 🙏




