Home जिल्हा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वरोऱ्यात ‘तुत्या-रुमन’ आंदोलन; प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वरोऱ्यात ‘तुत्या-रुमन’ आंदोलन; प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक

वरोरा (चंद्रपूर): शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या, सोमवार ३० मार्च २०२६ रोजी वरोरा येथे भव्य ‘तुत्या-रुमन’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. किशोर म. डुकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सकाळी ११:०० वाजता गांधी चौक येथून सुरू होईल आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकेल. या आंदोलनात शेतकरी आपल्या पारंपरिक अवजारांसह (तुत्या व रुमन) सहभागी होऊन सरकारचा निषेध नोंदवणार आहेत.
आंदोलनातील प्रमुख मागण्या:
आंदोलकांनी प्रशासनासमोर खालील ६ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
👉 कर्जमाफीची अंमलबजावणी: महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन तातडीने पूर्ण करावे.
👉 पीक विमा वितरण: वरोरा-भद्रावती तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला आहे, त्यांना आठ दिवसांच्या आत नुकसान भरपाई मिळावी.
👉 अतिवृष्टी मदत: सन २०२५-२६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ मदत निधी देण्यात यावा.
👉 नाफेड पोर्टल दुरुस्ती: तांत्रिक अडचणींमुळे नाफेड पोर्टलवरून सुटलेल्या गावातील शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करावी.
👉 WCL पुनर्वसन: वरोरा-भद्रावती तालुक्यातील WCL संबंधित गावांचे पुनर्वसन करावे आणि ८०/२० च्या शासन निर्णयानुसार शेतीची खरेदी करावी.
टॅक्स सवलत: शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे, सर्पदंश किंवा वीज पडून मृत्यू पावलेल्या शेतकरी-शेतमजुरांच्या कुटुंबांना ग्रामपंचायत कर आणि वायदामध्ये सवलत मिळावी.
“सरकारने शेतकऱ्यांना केवळ आश्वासने दिली आहेत, प्रत्यक्षात मात्र बळीराजा आजही संकटात आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या हातामध्ये ‘तुत्या व रुमन’ घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
🛑 श्री. किशोर म. डुकरे, जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष.या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रहार जनशक्ती पक्ष आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून किती आक्रमक पवित्रा घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏