वरोरा : – अप्पर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे साहेब चंद्रपूर यांच्या दिनांक 12.3.2025 च्या आदेशावरून दि. 12 मार्च ला तहसीलदार कोटकर यांनी महसूल अधिनियम 1966 चे कलम 174 अन्वय वसुली करिता पाठवले सक्तीचे पत्र दंडाची रक्कम न भरल्यास कारवाई करण्यात येईल.अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी ,
तहसीलदार ते उप विभागीय अधिकारी ते अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात तब्बल 3 दंडाचा आदेश पारित छोटूभाई यांनी मा हायकोर्ट व.मा विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे कॅव्हेट दाखल केल्याने रेल्वे अधिकारी व ठेकेदार अपिलित गेले नाही त्यामुळे दंड भरणे बंधनकारक झाले आहे.तालुक्याच्या डोंगरगाव येथील रेल्वेच्या तिसऱ्या लाईन चे काम सुरू असतांना रेल्वे ठेकेदार यांनी बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात गौण खनीज उत्खनन करण्यात आले होते, दरम्यान या प्रकरणी चे कामगार नेते छोटू भाई शेख यांनी तहसीलदार यांचे कडे तक्रार केली होती व तहसीलदार यांनी रेल्वे कंत्राटदार यांचेवर दंड आकारणी केली होती, त्या आदेशाच्या विरोधात कंपनी उपविभागीय अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील मध्ये गेले परंतु अप्पर जिल्हाधिकारी यांनी रेल्वे अधिकारी व ठेकेदार विरोधातअवैध उत्खनन प्रकरणी
1 कोटी 61लाख 55 हजार दंडाचे पुन्हा आदेश पारित केल्याने छोटू भाई शेख यांच्या लढ्याला तिसऱ्यांदा मोठे यश मिळाले आहे,
रेल्वे अधिकारी व ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही झाल्यानंतर विभागीय आयुक्त व उच्च न्यायालय नागपूर यांच्याकडे अपील मध्ये जाऊ नये यासाठी छोटूभाई यांनी तिथे कॅव्हेट अर्ज दाखल केल्याने अधिकारी व ठेकेदाराला अपिलीमध्ये जाण्याकरिता विचार करावा लागेल त्यामुळे आता या प्रकरणात महसूल अधिनियम 1966 चे कलम 174 नुसार तहसीलदार यांनी पाठवलेले नोटीस नुसार पैसे भरणे बंधनकारक झाले आहे अन्यथा कार्यवाही करण्यात येईल असे नमूद आहे सदर कार्यवाहीअप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडून झालेल्या छोटूभाई यांच्यातर्फे झालेल्या 3 आदेशावरून आहे
यावेळी छोटूभाई यांनी सहकार्य करणारे अधिकारी पत्रकार व सहकारी मित्र यांना धन्यवाद दिले त्यांनी अशाच प्रकारे पद असो किंवा नसो शेतकरी शेतमजूर जनसामान्य नागरिकांसाठी काम करत राहू असे मत व्यक्त केले.
🙏जय विदर्भ 🙏




