वरोरा : – ✍️ अभिषेक किशोरराव भागडे
स्थानिक गोराबा वस्ती येथील ‘सकल हिंदू समाज’ यांच्या वतीने येत्या २७ मार्च रोजी वरोरा शहरात एका भव्य ‘विशाल हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात भक्तीमय वातावरणात ग्रंथ दिंडी देखील काढली जाणार आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप आणि वेळ
हे संमेलन २७ मार्च रोजी सायंकाळी ५:०० वाजता ‘डॉ. सपाटे डेंटल क्लिनिक’ समोर, महात्मा जोतिबा फुले चौक येथे संपन्न होईल. या सोहळ्यात प्रामुख्याने ग्रंथ दिंडी, गोमाता पूजन, प्रबोधनात्मक उद्बोधन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी असेल भव्य ग्रंथ दिंडी
कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण असलेली ग्रंथ दिंडी महात्मा जोतिबा फुले चौक येथून सुरू होईल. त्यानंतर जय भारती चौक आणि सावरकर चौक मार्गे मार्गक्रमण करत ही दिंडी पुन्हा महात्मा जोतिबा फुले चौक येथे विसर्जित होईल. तसेच महाप्रसादाचा आयोजन केले आहे. तसेच महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. नाव नोंदणी करिता आयोजक यांच्याशी संपर्क साधावा.
🛑 शिस्तबद्ध आयोजनाचा संकल्प 🛑
सकल हिंदू समाज, गोराबा वस्तीच्या आयोजकांनी हा संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि कायद्याचे पालन करून पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या भव्य धार्मिक आणि सामाजिक सोहळ्यात वरोरा शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
🙏जय विदर्भ 🙏




