वरोरा :- ✍️ अभिषेक किशोर भागडे
दिनांक 25/03/2026 रोजी डोंगरवार चौक वरोरा. त वरोरा. जि. चंद्रपूर येथे सकाळी 11 वाजता भीषण उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिकांची तहान भागवण्यासाठी रोटरी क्लब, वरोरा (डिस्ट्रिक्ट 3030 ) च्या वतीने शहरात ‘पानपोई’चा शुभारंभ करण्यात आला आहे. रोटरी क्लबच्या वर्ष 2025 -26 च्या उपक्रमांतर्गत ही पानपोई सुरू करण्यात आली असून, याचे उद्घाटन वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
‘जल ही जीवन है’ आणि ‘जल है तो कल है’ हा संदेश देत रोटरी क्लबने सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम हाती घेतला आहे. वाढत्या तापमानामुळे प्रवाशांना आणि सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
गरजूंना मदतीचे आवाहन
केवळ पाण्याची सोयच नव्हे, तर रोटरी क्लबने यावर्षी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी गरीब व गरजू नागरिकांना सुती गमछा (उपरणे) व स्लिपर रोटरी क्लबतर्फे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्यांना याची गरज आहे किंवा ज्यांच्या पाहण्यात असे गरजू व्यक्ती आहेत, त्यांनी रोटरी क्लबच्या 9860464801 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष योगेश डोंगरवार, प्रकल्प प्रमुख चेतन शर्मा, सचिव राहुल पावडे आणि संयोजक विक्की आगलावे यांच्यासह रोटरी क्लबचे अन्य पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरी क्लबच्या या लोकोपयोगी उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
🙏🏻 जय विदर्भ🙏🏻




