नांदा (चंद्रपूर): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदा येथे महिलांसाठी एका विशेष सांस्कृतिक आणि मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सक्सेस अबॅकस अकॅडमी (नांदा), तनिष्का व्यासपीठ (स्त्री प्रतिष्ठा) आणि श्रीराम दर्शन बहुउदेशीय संस्था (नांदा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम रविवार, १५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत राधेश्याम मंगल कार्यालय, शांती कॉलनी, नांदाफाटा येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे:
या सोहळ्यात महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
सांस्कृतिक स्पर्धा: सामूहिक नृत्य स्पर्धा, रॅम्प वॉक आणि संगीताची खुर्ची यांसारख्या मनोरंजक स्पर्धांचे आयोजन.
महिला सक्षमीकरण: महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा आणि महिला उद्योजिकांचा सन्मान सोहळा.
सभासद नोंदणी: तनिष्का व्यासपीठ अंतर्गत नवीन सभासद नोंदणी अभियान.
गुणगौरव: सक्सेस अबॅकस अकॅडमीच्या लेव्हल १ मधील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा.
या सर्व स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. “सशक्त महिला – समृद्ध समाज” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आयोजित या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात आले आहे.* सौ. पौर्णिमा श्रीवास्तव (युवा महिला उद्योजिका)
* डॉ. स्नेहल गोवर्धन ठाकरे (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदा)
* हर्षिता खारकर (Ambuja Foundation Education Department, Project Officer)
* राणी भाऊराव लिपटे (ICRP ग्राम सखी) कर्तुत्वन महिलांचा सत्कार होणार.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण:
महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा व उपक्रम राबवले जाणार आहेत:
अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी नेहा वासाडे मॅडम (चंद्रपूर जिल्हा समन्वयक, तनिष्का व्यासपीठ) यांच्याशी ८९९९६२३०५८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.




