
वरोरा : वरोरा–माढळी रोडवरील वनोजा गावासमोर गणपती मंदिराजवळ विद्युत विभागाचा खांब अक्षरशः झोपलेल्या अवस्थेत दिसून येत असून त्यामुळे परिसरात मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते हा खांब कधीही कोसळू शकतो आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर बाब एम.एस.ई.बी. (विद्युत वितरण) बांधकाम विभाग यांच्या निदर्शनास अनेकदा आणूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दररोज या मार्गावरून शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांची ये-जा असते. अशा परिस्थितीत विद्युत खांबाची ही धोकादायक स्थिती मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“ स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल,वरोरा ” तर्फे प्रशासनाला तातडीने जागे करून या धोकादायक खांबाची त्वरित दुरुस्ती किंवा बदल करण्यात यावा, अशी ठाम मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने वेळेत दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
🙏जय विदर्भ🙏
☎️ 9673574711
☎️ 8329889732



