चंद्रपूर :-शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांवर आणि नेतृत्वावर अफाट विश्वास ठेवून, चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. आशिष रणदिवे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे.
आज (७ ऑगस्ट) रोजी मुंबईतील ऐतिहासिक ‘मातोश्री’ निवासस्थानी हा दणदणीत पक्षप्रवेश पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , शिवसेना नेते व खासदार विनायकजी राऊत , आमदार मिलिंदजी नार्वेकर आणि प्रशांतजी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आशिष रणदिवे यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या महत्त्वपूर्ण प्रवेश सोहळ्याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख भास्करजी ताजने , उपजिल्हाप्रमुख अमितजी निब्रड , संपर्क प्रमुख दिलीपजी कदम , विधानसभा प्रमुख बंडूजी डाखरे, भद्रावती तालुका प्रमुख नरेशजी काळे, तालुका संघटक सचिनजी डुकरे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, चिमूर तालुका प्रमुख वैभव ठाकरे , ब्रम्हपुरी तालुका प्रमुख नरेंद्रजी गाडगीलवार , ब्रम्हपुरी शहर प्रमुख भूषण रामटेके , माजी उपजिल्हाप्रमुख मिलिंदजी भन्नारे तसेच युवासेना शहर प्रमुख सुरेशजी ठवरे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
राजकीय वर्तुळात चर्चा :- यापूर्वी अनेक पदाची धुरा सांभाळणाऱ्या आशिष रणदिवे यांच्या पक्षप्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद आणि कामगार क्षेत्रात पक्षाचा प्रभाव आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. या प्रवेशामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात पक्षाच्या बाजूने अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.
विरोधकांनी बदनामी करण्याचा कट अनेकदा रचला असून ते आपल्या कामाच्या जोरावर अशीच भाऊ रणदिवे हे सातत्याने चर्चेत राहते त्यांची कामाची शैली हीच त्यांची खरी ओळख आहे.




