Home Breaking News राज्यात ४ दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा; शेतकऱ्यांनी घ्यावी खबरदारी

राज्यात ४ दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा; शेतकऱ्यांनी घ्यावी खबरदारी

राज्यात ४ दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा; शेतकऱ्यांनी घ्यावी खबरदारी महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील १७ ते २० मार्च दरम्यान अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवू शकतो. विशेषतः १८ ते २० मार्च दरम्यान हवामान अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहण्याची गरज आहे. काढून ठेवलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत, तसेच पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अद्ययावत अंदाजावर सतत लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत, तसेच संभाव्य पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

🙏जय विदर्भ🙏