Home महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नागपूर ग्रीन...

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी यांच्या पुढाकाराने भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

नागपूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी यांच्या पुढाकाराने भव्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नऊ रोटरी क्लब, इनर व्हील क्लब आणि मातरा किचन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. नागपूर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या स्पर्धेत एकूण २५ स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या पाककलेचे कौशल्य सादर केले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रणाली सिंगरू, विशाखा पवार आणि अदिती देशपांडे यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेत रोहिणी देशकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर भावना देशपांडे यांनी द्वितीय आणि अजय कोठेकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. प्रणाली सिंगरू, अदिती देशपांडे आणि विशाखा पवार हे पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. ही पारितोषिके आरसीएन एलिटचे अध्यक्ष रत्ना सना पंडित यांच्या प्रायोजकत्वातून देण्यात आली.

कार्यक्रमाला विविध सहकार्य करणाऱ्या रोटरी क्लबचे अध्यक्ष, सचिव आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी स्पर्धकांचे मनोबल वाढवत महिलांच्या कौशल्याचे कौतुक केले.

प्रमुख पाहुणे विष्णू मनोहर यांनी स्पर्धकांनी तयार केलेल्या पदार्थांची चव घेत त्यांना मार्गदर्शन केले आणि स्वयंपाकातील महत्त्वाच्या टिप्स दिल्या. तसेच विविध खाद्यपदार्थांवर आधारित सुंदर आणि सर्जनशील कविता सादर करून उपस्थित प्रेक्षकांचेही मनोरंजन केले.

या उपक्रमामुळे महिलांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळाले असून समाजात महिलांच्या सक्षमीकरणाचा ठाम संदेश देण्यात आला.

🙏जय विदर्भ🙏

नऊ रोटरी क्लब, इनर व्हील क्लब आणि मातरा किचन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. नागपूर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.