११ वे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन वरोरा येथे संपन्न होणार
उद्घाटन १५ नोव्हेंबर रोजी, समारोप १६ नोव्हेंबरला
वरोरा ( अभिषेक भागडे )✍️: लोकशिक्षण संस्था, वरोरा यांच्या वतीने आयोजित ११ वे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन शनिवार, दि. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात सुरू होणार आहे.
उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीकांत पाटील भूषवणार असून, संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकासभाऊ आमटे, सचिव – महारोगी सेवा समिती, आनंदवन यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला पद्मभूषण डॉ. ज्येष्ठ राज जोशी, अध्यक्ष – मराठी विज्ञान परिषद तथा गुरुकुल ICT मुंबई हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. मानस राजाध्यक्ष, डॉ. विवेक पाटकर, डॉ. दिलीपजी हेर्लेकर, श्री. अभय यालवकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
—
समारोप सोहळा – १६ नोव्हेंबर २०२५
रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीपजी हेर्लेकर असतील.
समारोपाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. गजानन मुंडकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती वरोरा तसेच डॉ. मिलिंद वाटवे, ज्येष्ठ संशोधक, IISER पुणे उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाचे आयोजन लोकशिक्षण संस्था, वरोरा तसेच प्राचार्य, लोकमान्य महाविद्यालय तथा कनिष्ठ विद्यालय, वरोरा यांच्या विनीत प्रयत्नातून करण्यात आले आहे.
राज्यातील बाल वैज्ञानिकांना आपली सृजनशीलता, शोधक वृत्ती आणि विज्ञानावरील ओढ व्यक्त करण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.
( बातमी व जाहीराती करता संपर्क साधा. ☎️9673574711☎️8329889732 )
—🙏 जय विदर्भ 🙏—




