📰 पालकमंत्री अशोकजी वुईके यांचा वरोरा दौरा — शेतकरी, कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा
वरोरा (ता. वरोरा) —
चंद्रपूर जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री श्री अशोकजी वुईके साहेब यांनी आज (बुधवार) मौजा भद्रावती येथे शेगाव–मुधोली–मोहर्ली मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहून विकासकामांना शुभारंभ केला.
या कार्यक्रमानंतर दुपारी 3.30 वाजता पालकमंत्री वुईके साहेब वरोरा येथील रेस्ट हाऊसला आले. तेथे त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी भेट घेतली, संवाद साधला आणि विविध विषयांवर योग्य मार्गदर्शन केले.
बैठकीदरम्यान त्यांनी कर्जमाफी आणि शेतकरी समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे, तसेच रमेशजी राजुरकर (निवडणूक प्रमुख वरोरा–भद्रावती), विजयजी मोकाशी, बाळासाहेब भोयर, विठ्ठल लेडे, राजूभाऊ दोडके, विठ्ठल टाले, भद्रावती येथील सुनील भाऊ नामोजवार, सुरज चौधरी व वरोरा -भद्रावती युवा मोर्चा तथा इतर आघाडी चे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चरूर-खटी ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश भाऊ माहुरे यांनी पालकमंत्री साहेबांना आपल्या गावातील रस्ते, समशान भूमी पाणीपुरवठा आणि इतर विकासकामांबाबत निवेदन सादर करून समस्या मांडल्या.
पालकमंत्री वुईके यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत शासनस्तरावर लवकरच आवश्यक ती कार्यवाही होईल, असे आश्वासन दिले.
🔸 संवाद व रिपोर्ट : अभिषेक किशोरराव भागडे
— 🙏जय विदर्भ 🙏—




