🌿 टा. ग्रुप शहर सचिव वैभवभाऊ टिपले यांचा सामाजिक उपक्रम — रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप

वरोरा | स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल

“मानवतेची सेवा हीच खरी सामाजिक सेवा” या भावनेतून टा. ग्रुप शहर सचिव वैभवभाऊ टिपले यांच्या वाढदिवसानिमित्त एक प्रशंसनीय सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वरोरा येथील शासकीय रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करून समाजसेवेचा अनोखा संदेश देण्यात आला.

हा उपक्रम टा. ग्रुप राष्ट्रीय संस्थापक मा. पै वस्ताद जालिंदरभाऊ जाधव यांच्या प्रेरणेतून, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मा. पै. डॉ. तानाजीभाऊ जाधव आणि गडचिरोली जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

वरोरा टा. ग्रुप अध्यक्ष आणि युवा सामाजिक कार्यकर्ते मा. रिषभभाऊ रठ्ठे यांच्या नेतृत्वात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी टा. ग्रुप सदस्य अमोलभाऊ क्षीरसागर, ओम कार्लेकर, चेतन सातपुते, प्रविण खिरटकर, तसेच योग मंडळाचे सक्रिय सदस्य व सामाजिक कार्यकर्ते प्रविणभाऊ सूराणा आणि अनिलभाऊ मेश्राम उपस्थित होते.

या प्रसंगी वरोरा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमुख मा. डॉ. खुजे साहेब आणि डॉ. शेख साहेब यांनी उपस्थित राहून टा. ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले व पुढील सामाजिक कार्यासाठी आशीर्वाद व मार्गदर्शन दिले.

सामाजिक जाणिवेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा ठरला. वैभवभाऊ टिपले यांचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करून त्यांनी “सेवा हाच सर्वोच्च धर्म” या मूल्याला प्रत्यक्ष कृतीत उतरवले.

— स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल

—🙏 जय विदर्भ🙏—