इस्लामपूरचे ‘ईश्वरपूर’ नामांतर केंद्र सरकारकडून मंजूर
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामांतर करण्यास केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली असून गेले ५० वर्षापासून प्रलंबित असलेले मागणीला अवघ्या ४ महिन्यात मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली न्याय मिळाला आहे. या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्याचप्रमाणे २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा सभागृहात उपस्थित करून राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने इस्लामपूरचे ईश्वरपूर आणि इस्लामपूर नगरपरिषदेचे “उरण ईश्वरपूर” असा नामांतरणाबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सांगली जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिले होते.
त्या पाठपुराव्याला यश मिळत राज्य शासनाने ‘इस्लामपूरचे ईश्वरपूर’ असे नामांतर करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे केली होती आणि आता केंद्र शासनाने त्यास हिरवा कंदील दाखवला आहे. आता पुढील टप्प्यात इस्लामपूर नगरपरिषदेचे नामकरणही “उरण ईश्वरपूर नगरपरिषद” असे करण्यात येणार आहे.
इस्लामपूरचे ईश्वरपुर नामकरण झाल्याबद्दल राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुंबई येथे भेट घेऊन पुष्पगुच्छ देत आभार मानले आहेत. त्याचबरोबर केंद्र शासनाचे, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे, सांगलीचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांचे देखील आभार मानले. यावेळी माझ्यासमवेत आमदार गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते.




