Home Breaking News कुपवाडा येथून शस्त्रांसह दहशतवाद्याला अटक

कुपवाडा येथून शस्त्रांसह दहशतवाद्याला अटक

कुपवाडा : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी आज, गुरुवारी एका दहशतवाद्याला अटक केलीय. त्याच्याकडून शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्धसामुग्री जप्त करण्यात आली आहे.याबाबत लष्कराने सांगितले की, गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी सीमावर्ती जिल्ह्यातील लुनाहरे-पंजगामच्या सामान्य भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली.

यादरम्यान 15 आणि 16 मे च्या रात्री कुपवाडा येथे एका दहशतवाद्याला 2 पिस्तुले, मॅग्जीन, हातबॉम्ब आणि इतर युद्धसदृश वस्तूंसह पकडण्यात आले. सुरक्षा दलांकडून या दहशतवाद्याची सखोल चौकशी सुरू आहे.