Home महाराष्ट्र पत्र परिषदेत फडणवीसांनी दिला ‘हा’ शब्द

पत्र परिषदेत फडणवीसांनी दिला ‘हा’ शब्द

पत्र परिषदेत फडणवीसांनी दिला 'हा' शब्द
fadnavis-gave-the-word-ha-in-the-letter-conference

 

नागपूर (Nagpur) :- देवेंद्र फडणवीस आजची पत्र परिषद नागपूरयेथे पार पडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला आज एक महत्त्वाचा शब्द दिला. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी वाढत्या सायबर गुन्हेगारीबद्दल सुद्धा ते बोलले. “आता सर्व माहिती व्हॉट्सअपला मागता येते. त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे की, नुसता गुन्हा करणारा गुन्हेगार नाही, तर अशा गोष्टी फॉरवर्ड केल्याने आपण सहगुन्हेगार होतो” असं ते म्हणाले.

“पुढील पाच वर्षात आम्ही लोकांना घरे देणार आहोत. सर्व योजनांतून जी घरे होतील, त्या लोकांना सोलर देणार आहे. घरात राहायला जाणाऱ्यांना मोफत वीज मिळेल. त्यांना बिलच येणार नाही. हा आमचा प्रयत्न आहे. मला जी काही संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करेल. नागपूरकर म्हणून नागपूरची मान उंच राहिली पाहिजे. आपला प्रतिनिधी काम करत असताना महाराष्ट्रात बदल घडतोय अशी उंची महाराष्ट्राला देणार आहे. पारदर्शी कारभार करणार आहे” असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलं.

“आव्हानं खूप आहेत. राजकारणात सर्व स्तरावर जाऊन लोक राजकारण करतात. पण दहा वर्षाचा माझा कार्यकाळ पाहिला असेल तर कितीही आवाहन आलं तरी मी धैर्यपूर्वक आव्हानांना सामोरे जात असतो. सत्ता मी कधीच डोक्यात जाऊ देत नाही. सत्ता हे सेवेचं साधन म्हणून मी पाहतो. मी माझ्या डोक्यात कधीही सत्ता जाऊ देणार नाही” असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

“काही नालायक लोक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना लुबाडत आहेत. जाती जातीत द्वेष निर्माण करत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार सायबर अवेयरनेस करत आहे. सायबर सेक्युरिटीचं काम सुरू आहे. डिजीटल आणि सायबर प्लॅटफॉर्मचं एकत्रीकरण केलं आहे. जगातील बेस्ट टुल्स आपल्याकडे आहे. त्याद्वारे आपण वेगाने सायबर गुन्हे उघडकीस आणू शकतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Nagpur today
Nagpur is famous for
www.nagpur.gov.in 2024
Nagpur which state
Nagpur in which state in Map
Nagpur Pin code
Nagpur map
Nagpur city area in sq km