Home महाराष्ट्र ‘महायुतीसह भाजपच्या अभूतपूर्व यशानंतर देवेंद्र फडणवीसांना ‘खास’ व्यक्तिचा फोन

‘महायुतीसह भाजपच्या अभूतपूर्व यशानंतर देवेंद्र फडणवीसांना ‘खास’ व्यक्तिचा फोन

Devendra Fadnavis

आनंद द्विगुणित

मुंबई (Mumbai) :- लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. तर राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. देवेंद्र फडणवीस हे सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात उतरले होते. तर पहिल्या कलापासून फडणवीस हे आघाडीवर असल्याचे चित्र होते. महाराष्ट्रातील 288 विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे अपडेट हाती येत असून भाजप महायुतीला तब्बल 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असे चित्र दिसून येते. या निकालानंतर भाजप महायुती मधील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे.

एकीकडे भाजप नेत्यांकडूनही पेढे वाटून जल्लोष केला जात असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कार्यालयात शुकशुकाट झाल्याचे चित्र आहे. तर, भाजपने 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा रंगली आहे. त्यातच, देवेंद्र फडणवीस यांचे यश बघता त्यांच्या मातोश्री भावुक झाल्या आहेत. तर फडणवीस याचे सख्खे भाऊ आशिष फडणवीस यांनी पहिल्यांदाच पुढे येत आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Mumbai City
Mumbai map
Mumbai Indian
Mumbai district Name
Population of Mumbai in crores
Where is Mumbai located in India
Mumbai population
Mumbai city name list