Home Breaking News पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार २० पेक्षा जास्त प्रचारसभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार २० पेक्षा जास्त प्रचारसभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार २० पेक्षा जास्त प्रचारसभा
prime-minister-narendra-modi-will-hold-more-than-20-campaign-meetings

जम्मू-काश्मीर आणि हरयाणातील विधानसभा निवडणूक

जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) :- जम्मू-काश्मीर आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निवडणुकीत अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. पंतप्रधान मोदी सभा घेणार आहेत, अशा मतदारसंघांबाबत, वेळेबाबत नियोजन सुरू आहे. ते काश्मिरात दोन आणि जम्मूमध्ये किमान आठ सभा घेण्याची शक्यता आहे. ९० सदस्यांच्या हरयाणामध्येही ते (Prime Minister Narendra Modi) आठ ते दहा सभांना संबोधित करू शकतात.

जम्मू-काश्मिरातील ९० जागांपैकी जम्मूतील सर्व ४३ जागा भाजप लढणार आहे, तर काश्मिरातील २० ते २७ जागा लढणार आहे. मात्र, तेथील १० ते १२ जागा जिंकण्यासाठी भाजपचा जोर असेल. खोऱ्यातील उर्वरित जागांवर भाजप लहान पक्ष आणि अपक्षांना अप्रत्यक्ष पाठिंबा देऊ शकतो.

भाजपने (BJP) या निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे दिली आहे. नरेंद्र मोदी हे प्रचाराचे नेतृत्त्व करतील. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) , संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनुराग ठाकूर यांच्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आदी स्टार प्रचारक असतील.

Jammu and Kashmir News
Jammu and Kashmir Map
Jammu and Kashmir capital
Jammu and Kashmir history
Jammu and Kashmir population
Domicile Certificate download Jammu and Kashmir
When was Jammu and Kashmir declared as Union Territory
Jammu and Kashmir Map with districts