Home Breaking News विनेश फोगाटची कुस्तीतून निवृत्ती

विनेश फोगाटची कुस्तीतून निवृत्ती

 

Paris 2024 Olympics :- महिला कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) कुस्तीतून संन्यास घेतला आहे. एक भावनिक पोस्ट लिहून तिने कुस्तीला अलविदा केलं आहे. कुस्ती स्पर्धा आपल्याला आईसारखी आहे. आज मी कुस्तीशी हरले असं म्हणत विनेशने ही भावनिक पोस्ट केली आहे आणि कुस्तीमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

ऑलिम्पिकच्या(Paris 2024 Olympics) कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या विनेश फोगाटचं वजन १५० ग्रॅमने जास्त भरलं त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि तिचं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. ज्यानंतर निराश झालेल्या विनेशने कुस्तीला अलविदा केला आहे.

विनेश फोगाट दुखापतीचे निमित्त करून रौप्यपदक जिंकू शकली असती का? नियम काय म्हणतात
सध्या विनेश फोगाटने ऑलिम्पिकच्या निर्णयाविरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये तक्रार केली आहे. विनेश फोगाटला पदक मिळणार की नाही याबाबत सीएएस आज निर्णय देणार आहे. वजन कमी करण्यासाठी विनेशने रात्रभर मेहनत केली, त्यामुळे तिच्या शरीरात पाणी कमी झाल्याने ती आजारी पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.