Home Breaking News Pune Porsche : कार अपघात तांत्रिक बाबींची पडताळणी पूर्ण

Pune Porsche : कार अपघात तांत्रिक बाबींची पडताळणी पूर्ण

निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून पोलिसांना मार्गदर्शन

पुणे : कल्याणीनगरमधील अपघाताच्या वेळी मोटारीचा वेग, तसेच दुचाकीला धडक दिल्यानंतर पडलेला प्रभाव अशा तांत्रिक बाबींची पडताळणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मदतीने पोलिसांनी अपघात प्रभाव मूल्यांकन (क्रॅश इम्पॅक्ट ॲसेसमेंट) नुकतेच केले. पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी मोटार चालवत अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. अपघाताचा प्रसंग पोलिसांनी पुन्हा उभा (recreation) केला आहे. अपघात घडला तेव्हा मोटारीचा वेग किती होता. अपघातानंतर वेगाचा प्रभाव किती पडला, याची सविस्तर माहिती घेण्यात आली आहे. येरवडा पोलिस ठाण्यात जप्त केलेल्या अपघातग्रस्त मोटारीची पाहणी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून करण्यात आली. अपघातात मृत्यूमुखी पडलेले संगणक अभियंता तरुण-तरुणीचा शवविच्छेदन अहवालाची पाहणी पुन्हा करण्यात आली. मोटारीच्या धडकेनंतर सहप्रवासी तरुणी १५ ते २० फूट हवेत उडाली आणि ती मोटारीच्या काचेवर पडली.