Home Breaking News केव्हा एकदा पाऊस पडेल व उष्णतेपासून दिलासा मिळेल

केव्हा एकदा पाऊस पडेल व उष्णतेपासून दिलासा मिळेल

पावसाळी गारव्याऐवजी प्रचंड उकाड्याने बेहाल झालेल्या वैदर्भीयांचे डाेळे आकाशाकडे

यंदा माेसमी पावसाचे दरवर्षीपेक्षा लवकर आगमन देशात झाले. मान्सून अरबी समुद्रापर्यंत धडकला व ही शाखा अधिक सक्रिय हाेत महाराष्ट्राच्या किणारपट्टीवर पाेहचली. मुंबई, काेकणात जाेरदार माेसमी पावसाचा अंदाज आहे. या काळात पूर्वमाेसमी पाऊस विदर्भातही जाेरदार हजेरी लावेल, असा अंदाज हाेता. मात्र गेल्या चार दिवसांपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्हे भयंकर उकाड्याचा सामना करीत आहेत. विशेष म्हणजे आकाश ढगांनी व्यापलेले आहे व काही भागात तुरळक पाऊसही झाला. मात्र त्याने उकाड्यापासून दिलासा दिला नाही. तडपणारा सूर्य व ढगांचे बाष्प यांच्या संयुगाने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवते. ४० अंशावर असलेला पारा ४३ अंशाची जाणीव करताे.रविवारी नागपूरचा पारा २ अंशाने घटत ३९.६ अंशावर आला. मात्र उकाडा ४१ अंशाप्रमाणे जाणवत हाेता. अकाेला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्यावर कायम आहे. त्यामुळे ढग असूनही त्याचा फायदा नागरिकांना नाही.