वरोरा :- लोक शिक्षण संस्था,वरोरा,द्वारा संचालित,लोकमान्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस 24 सप्टेंबरला साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित मणियार (अध्यक्ष,रोटरी क्लब,वरोरा) होते. राष्ट्रीय सेवा योजना दिवसाच्या निमित्ताने बोलताना अभिजित मणीयार म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब मार्फत नियमितपणे वृक्षारोपण,पर्यावरण जनजागृती रॅली, वृक्षसंवर्धन,स्वच्छता अभियान, रक्तदान ,आरोग्य तपासणी,नशामुक्त अभियान,साक्षरता अभियान उपक्रम राबविले जातात तसेच निबंध ,कथाकथन, गीत- गायन,वक्तृत्व, वादविवाद,पोस्टर रांगोळी,रील स्पर्धा,एकांकिकेतून प्रबोधन अशा बऱ्याच स्पर्धा – उपक्रम आयोजित होत असल्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना,रोटरी क्लब व अशा बऱ्याच संस्था व त्यातील उपक्रम शिक्षण व समाज यांना जोडणारा प्रभावी दुवा आहे.या अनुषंगाने मत मांडले.तसेच प्रत्येक वेळी अपयश आले तरी एक संधी व यश तुमच्यासाठी हमखास आहे.या व्यापक विचाराने दैनंदिन जीवन काळानुसार आनंदाने जगा.हा मोलाचा संदेशही स्वयंसेवकांना याप्रसंगी सांगितला व स्वयंसेवकांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा,प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री यांनी अध्यक्षीय समारोपातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमामार्फत स्वयंशिस्त,समाजसेवा,राष्ट्रीय एकात्मता ,मूल्यशिक्षण, सामाजिक बांधिलकी व कौशल्यात्मक बाबी मिळत असल्यामुळे त्याचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्यांनी नक्की घ्यावा.असे आवाहन केले व स्वयंसेवकांचे कौतुक केले.तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा त्यांच्या नियमित होत असलेल्या सहकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.या
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन,स्तवन व गोडवाना विद्यापीठ गीताने झाली तर शेवट खरा तो एकची धर्म या सामुदायिक प्रार्थनेने झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत पुरी व प्रस्ताविक डॉ. रवींद्र शेंडे यांनी केले.तर उपस्थितांचे प्रा. शास्त्रकार यांनी मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे व माजी स्वयंसेवकांचे खुप मोलाचे सहकार्य मिळाले.




